Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

मंडणगड : गावठी हातभट्टी दारू प्रकरणी गुन्हा दाखल

banner 468x60

तालुक्यातील शिपोळे येथे गावठी हातभट्टीची ९०० रुपयांची १० लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. करण्यात आली. संतोष यशवंत भागणे (४५, रा. मंडणगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस अंमलदार विजय वळवी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी तो शिपोळे गावालगत झाडी-झुडपांमध्ये गावठी हातभट्टीची १० लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *