Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

मंडणगड : बसस्थानकात आरक्षित सीटच्या वादातून महिला प्रवाशाकडून एसटी वाहकाला मारहाण

banner 468x60

मंडणगड बसस्थानकात एसटी बसमधील आरक्षित जागेवर बसण्याच्या कारणावरून झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला प्रवाशाने कर्तव्यावर असलेल्या एसटी वाहकाची कॉलर पकडून शिवीगाळ करत कानाखाली मारल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, केशव अशोक पांढरे (वय ४२) हे मंडणगड एसटी डेपोत वाहक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार, १२ मे २०२६ रोजी ते नालासोपारा ते डौली या एसटी बसवर (क्रमांक MH 20 BL 3337) ड्युटीवर होते. नियमित प्रवासी सेवा सुरू असताना बस मंडणगड येथे पोहोचली. त्यावेळी बसमधील आसन क्रमांक १९, २० आणि २१ या आरक्षित जागांवरून महिला प्रवाशासोबत वाहक पांढरे यांचा वाद सुरू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रवासी रिद्धी प्रफुल्ल लाड (रा. गवळवाडी कांगवाई, ता. दापोली) ही कांदिवली समतानगर येथील बसस्टॉपवर थांबली नव्हती. तरीदेखील ती बोरीवली-दापोली बसने मंडणगड येथे पोहोचली होती. मंडणगड बसस्थानकात आल्यानंतर तिने आरक्षित सीटच्या मुद्द्यावरून वाहकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढत जाऊन बसस्थानकातील कंट्रोल केबिनजवळ पोहोचला. यावेळी आरोपी महिलेने गणवेशात असलेल्या वाहक केशव पांढरे यांची शर्टची कॉलर पकडली. तसेच त्यांना शिवीगाळ करत कानाखाली मारून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे काही काळ बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर केशव पांढरे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रिद्धी प्रफुल्ल लाड हिच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १३२, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि धमकी देणे या आरोपांखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कर्तव्य बजावत असताना एसटी वाहकावर झालेल्या या हल्ल्यामुळे एसटी कर्मचारी आणि वाहक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *