Breaking News
चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ लांजा : हर्चे शाखा डाकघरात 8.20 लाखांचा अपहार, तत्कालीन शाखा डाकपालाविरोधात गुन्हा

लांजा : हर्चे शाखा डाकघरात 8.20 लाखांचा अपहार, तत्कालीन शाखा डाकपालाविरोधात गुन्हा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील हर्चे शाखा डाकघरात कार्यरत असताना ग्राहकांच्या ठेवीच्या रकमेचा तब्बल ८ लाख २० हजार १५२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार (रा. हर्चे, ता. लांजा) याच्याविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे डाक विभागासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

banner 728x90

या प्रकरणी समीर सूर्यकांत बेल्हेकर, डाकघर निरीक्षक, लांजा उपविभाग यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी जयप्रकाश पवार हा हर्चे शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना ग्राहकांकडून पोस्ट कार्यालयात विविध बचत खाती उघडण्यासाठी व ठेवी भरण्यासाठी स्वीकारलेली रक्कम सरकारी नोंदीत जमा न करता स्वतःच्या ताब्यात ठेवत होता.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०१३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या तब्बल अकरा वर्षांच्या कालावधीत आरोपीने ग्राहकांकडून स्वीकारलेल्या रकमेची अधिकृत दस्तऐवजांमध्ये नोंद केली नाही. ही रक्कम शासनाच्या खात्यात जमा करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून आर्थिक अपहार केला.

या गैरव्यवहारात ५ लाख ३० हजार १५२ रुपये कायमस्वरूपी अपहार करण्यात आल्याचे, तर २ लाख ९० हजार रुपये तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे एकूण ८ लाख २० हजार १५२ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे.

या प्रकरणी १३ जुलै २०२६ रोजी रात्री ९.१९ वाजता लांजा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४०९ (लोकसेवक किंवा विश्वासू व्यक्तीकडून गुन्हेगारी विश्वासघात) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१६ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अपहाराची रक्कम, त्याचा लाभार्थी, तसेच या गैरव्यवहारात अन्य कोणी सहभागी होते का, याचाही तपास सुरू आहे. तसेच संबंधित ग्राहकांचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि संपूर्ण व्यवहाराची पडताळणी करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *