Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : बँकेची फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

banner 468x60

एलआयसीची बनावट कर्जरोखे व कागदपत्रे तयार करून रत्नागिरीतील बँकेला लाखो रूपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

संशयितांनी बँकेकडे सुमारे 68 लाख रूपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता.मात्र कागदपत्रे बनावट असल्याचे समोर येताच बँकेच्या व्यवस्थापकांनी या प्रकरणी शहर पोलिसांत तकार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी चौघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

अभिजित दिलीप जाधव (रा. मारूती मंदिर, रत्नागिरी), संजय सुर्वे (रा. अंधेरी मुंबई), अरूण शिंदे (रा. बोरिवली, मुंबई) व अजितराव (रा. कांदिवली, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.यातील अरूण शिंदे हे त्याच बँकेच्या गोरेगांव येथील शाखेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत.

तर संजय सुर्वे हे कर्ज एजंट म्हणून काम करतात.बनावट कागदपत्रे तयार करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथेही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.रत्नागिरीतील एस.व्ही. सी.बँक मारूती मंदिर शाखेचे व्यवस्थापक गणेश रावसाहेब पाटील यांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस.व्ही.सी.बँक,गोरेगांव शाखा येथे काम करणारे अरूण शिंदे यांनी 8 जून 2023 रोजी रत्नागिरीतील शाखेत फोन करून अभिजित जाधव यांच्या नावे एलआयसी कर्जरोखे यांच्या आधारे कर्जवितरण करण्यासंबंधी फोन केला होता.

यानंतर अभिजित जाधव यांनी रत्नागिरीच्या शाखेत येवून कागदपत्रे सादर केली व 68 लाख रूपयांचे कर्ज मंजूर करावे,असा अर्ज बँकेकडे केला. रत्नागिरी शाखेने या कर्जाची कागदपत्रे कोल्हापूर येथील कार्यालयात पाठवून कर्ज मंजूर करण्यात आले.

कर्ज मंजूर होताच गोरेगांव शाखेतील अरूण शिंदे,संजय सुर्वे यांनी रत्नागिरी शाखेत फोन करून कागदपत्रे पाठवून देण्याची मागणी केली.तसेच आपल्या बँकेचे क्लस्टर हेड अजितराव यांच्याशी बोलणे झाले असल्याबद्दलही सांगण्यात आले. याचदरम्यान रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांना एलआयसीच्या कर्जरोख्यांबद्दल शंका आल्याने त्यांनी रत्नागिरी येथील एलआयसी कार्यालयात जावून चौकशी केली असता

या कागदपत्रांचा कोणताही रेकॉर्ड आढळला नाही.बँकेकडून करण्यात आलेल्या पुढील तपासणीत अभिजित जाधव याने सादर केलेले कागदपत्र हे बनावट असल्याचे आढळले.

त्यानुसार बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यापकरणी बँक व्यवस्थापक गणेश पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी चौघाजणांविरूद्ध नुसार गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *