Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : पनवेलमधून गावी आला, 23 वर्षीय तरुण विसर्जन मिरवणुकीवेळी बुडाला

banner 468x60

रत्नागिरी : पनवेलमधून कोकणातील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी आलेला एक युवक विसर्जन मिरवणुकीवेळी बुडाल्याने बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy


रायपाटण येथील बाजार वाडी या ठिकाणचा अक्षय दिलीप शेट्ये (वय वर्ष २३) हा तरुण गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी रायपाटण येथील अर्जुना नदीच्या पात्रात गेला होता. शेट्ये कुटुंब पनवेल येथून कोकणात आपल्या गावी आलो होते. बेपत्ता झालेला अक्षय हा मुंबई परिसरात खासगी कंपनीत कामाला आहे.

गौरी गणपतीची विसर्जन मिरवणूक नदीवर सुरू असताना घोडकोंड (बाजारवाडी ) या नदीत अक्षय शेट्ये हा वाहत गेल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे,

राजापूर तालुका पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलाकर तळेकर यांच्यासहित पाचल मंडळ अधिकारी संजय पवार तलाठी सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गांगण, राजा नलावडे, मनोज गांगण, कुणाल गांगण, विकास कोलते परिसरातील स्थानिक नागरिक या तरुणाचा शोध घेत होते.

रात्री उशिरा ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, या बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध राजापूर पोलीस व स्थानिक ग्रामस्थ घेत असून उद्या सकाळ पुन्हा एकदा शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *