Breaking News
दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

संगमेश्वर : झाड तोडलं म्हणून बेदम मारलं

banner 468x60

तालुक्यातील कोडगाव-मुरलीधरआळी (ता. संगमेश्वर) येथे झाड तोडल्याच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. संशयितासह दोन महिलांविरुद्ध देवरूख पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

नीलेश बळीराम शेलार व अन्य दोन महिला असे संशयित आहेत. सदर घटना सोमवारी (ता. ७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोंडगाव- मुरलीधरआळी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश विजय पांचाळ यांच्या घराशेजारी असणारे फणसाचे झाड तोडल्यावरून पूर्वी वाद झाला होता.

याबाबत फिर्यादी व त्यांची आई-बहीण, पत्नी असे विचारणा करण्यासाठी गेले असता वादविवाद झाले व फिर्यादी यांचे कुटुंबीयांना घरी नेत असताना संशयितांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संदेश पांचाळ यांनी देवरूख पोलिसात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *