राजापुर : कन्याशाळेची इमारत धोकादायक

banner 468x60

शहरातील मोडकळीस आलेल्या जि. प. गोखले कन्या शाळा इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर होऊन चार महिने होत आले तरी जि. प. शिक्षण विभागाकडून धोकादायक बांधकाम पाडण्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या धोकादायक इमारतीमुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम पडून काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा शालेय व्यस्थापन समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

शहरातील जि. प. गोखले कन्या शाळेच्या आवारात दोन खोल्यांची शंभर वर्षांची जुनी इमारत आहे.

वास्तविक नवीन इमारत झाल्यावर या जुन्या शाळेच्या दोन वर्गखोल्या तत्काळ पाडणे आवश्यक होते.

मात्र, वारंवार याबाबत विनंती करून शिक्षण विभागाकडून कार्यवाही न झाल्याने पाच हजार रुपये खर्चून इमारतीच्या कौलाचे नुकसान होऊ नये म्हणून ती उतरून घेयन्यात आली. त्यानंतर सातत्याने जुन्या शाळेच्या दोन इमारतींचे निर्लेखन करून ही धोकादायक इमारत पाडण्यात यावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीकडून झाली.

या इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याला मंजुरी मिळून आता चार महिने होत आले आहेत. निर्लेखन प्रस्ताव मंजुरीनंतर पावसाळ्यापूर्वी निर्लेखनाचे काम मार्गी लावावे, अशी विनंतीही मुख्याध्यापकांनी केली होती.

मात्र , त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने सध्या ही धोकादायक इमारत अतिवृष्टीमुळे कोसळण्याचा व त्यापासून जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.

शाळेच्या परिसरातच हि इमारत असल्याने मुले खेळताना काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल पालकांतून विचारण्यात आला आहे. पालक सध्या धास्तावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *