दापोली : 74 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील साखळोली-पाचांबा येथे 74 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. रामचंद्र लक्ष्मण गौरत (वय 74, रा. साखळोली नवजीवनवाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र गौरत हे ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढण्याकरिता दापोली येथे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.


दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास साखळोली-पाचांबा परिसरात एका ऐनाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दुपारी १ वाजता त्यांना मृत घोषित केले.


या घटनेची दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *