Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

खेड : खेडमध्ये सापडले आणखी 6 डेंग्यूसदृश रुग्ण

banner 468x60

शहरासह ग्रामीण भागात थैमान घालणारी डेंगीची साथ नियंत्रणात आणण्यासाठी तालुका आरोग्य विभागास नगर प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असले तरी दिवसेंदिवस डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा वाढतच आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

शहरासह खोंडे, भरणे येथील ६ नव्या डेंगीसदृश रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ६६ वर पोहचली आहे. साथ रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत तेथे औषधांचे द्रावण तयार करून टाकण्यावर भर देण्यात येत आहे.

तीनबत्तीनाका परिसरासह पावसकर नाका, समर्थनगर परिसरात डेंग्यूसदृश सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. साथग्रस्त भागात नगर प्रशासनाने जंतूनाशक फवारणी करूनही डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव वाढतच आहे.

तालुका आरोग्य विभागाने डोअर टू डोअर सर्वेक्षणासह कंटेनर सर्वे अधिक गतिमान केला आहे. शहरापाठोपाठ तालुक्यातील १३ गावांमध्येही डेंग्यू साथीने डोके वर काढले आहे.

या साथग्रस्त गावांमध्येही तालुका आरोग्य विभागाकडून डोअर टू डोअर सर्वेक्षणासह नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *