Breaking News
गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी खेड : व्यवस्थापन क्षेत्रात करिअरची संधी MBA / MMS प्रवेशासाठी ATMA 2026 द्वारे सुवर्णसंधी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप रत्नागिरी : नोटेच्या बदल्यात लाखांचे स्वप्न, 15 लाखांचे आमिष, 9 लाखांचा गंडा “जुन्या 5 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात 15 लाख रुपये मिळवून देतो”

खेड : मोबाईल अॅपवरून 1 लाख 80 हजारांची फसवणूक

banner 468x60

भरणे समर्थनगर येथील एकाची मोबाईल अॅपद्वारे १ लाख ८० हजारांची फसवणूक झाल्याप्रकरणी येथील पोलिसात एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.ही घटना १० डिसेंबरला घडली. यातील फसवणूक झालेली व्यक्ती टेलिग्राम या मोबाईल अॅपमध्ये एका ग्रुपला जॉईन झाली होती. त्यामधील एका अनोळखी व्यक्तीने एक लिंक पाठवली होती.

त्या लिंकला फियादी यांनी ओपन केले. त्या ग्रुपवरील एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना त्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, बँकेची माहिती मागितली.

त्यांनी ती माहिती त्या अज्ञात व्यक्तीला दिली आणि त्याने दिलेले तीन टास्क खेळून त्यांना २५० रुपये पाठवले, तसेच पुन्हा एक लिंक पाठवून काही वेळात जास्तीचे पैसे देतो, असे आश्वासन देत फिर्यादीचा विश्वास संपादन करत १ लाख ८० हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *