दापोली : पोलिस अधिकारी विवेक अहिरे आणि पोलिस उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर यांच्या सामंजस्यांच्या भूमिकेमुळे परिस्थिती नियंत्रणात, सर्वच स्थरातून पोलिसांचं कौतुक

banner 468x60

सोशल मीडियावर भावना दुखावतील अशी पोस्ट टाकल्यामुळे दापोलीत २३ जानेवारीला तणाव निर्माण झाला.

शहरातील शिवपुतळ्यासमोर (Chhatrapati Shivaji Maharaj) एकत्रित आलेल्या जमावाने आणि पोस्ट टाकणाऱ्याला तत्काळ अटक करा, अशी मागणी करत ठिय्या आंदोलन केले.

banner 728x90

त्यामुळे दापोलीतून दाभोळ, बुरोंडी, हर्णै, केळशीकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला दापोली पोलिस (Dapoli Police) ठाण्यातील प्रांगणात नेले.

तेथे पोस्ट टाकणाऱ्याने जमावासमोर माफी मागितल्यानंतर दोन तासांनी जमाव पांगला. निर्माण झालेल्या तणावामुळे दापोलीत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकारात पोलिसांनी केलेलं कार्य हे कौतूकास्पद आहे. पोलिसांनी योग्य भूमिका घेऊन हे प्रकरण शांत केलं.

पोलिस उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर व पोलिस अधिकारी विवेक अहिरे यांनी सामंजस्यांची भूमिका घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. शहरातील काही समाजकंटकांनी भावना दुखावतील अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या.

हे समजल्यानंतर मंगळवारी (ता. २३) दुपारी अचानक केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जमाव गोळा झाला.पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी जमावासमोर येऊन गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे सांगितले.

मात्र, जमावाने संशयितांनी जमावासमोर येऊन माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना दापोली पोलिस ठाण्यात येण्याचे आवाहन केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर दापोलीत आले. त्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. संशयित स्वतःहून माफी मागितली. दापोली पोलिसांच्या या कामामुळे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *