Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : पाळंदे समुद्रकिनारी आढळला मुलीचा मृतदेह

banner 468x60

पाळंदे येथील समुद्रकिनारी मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

पाळंदे येथील रहिवासी अनिल आरेकर हे सकाळी समुद्रावर गेले असता त्यांना वाळूमध्ये रुतलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला.

त्यांनी तातडीने याबद्दलची माहिती दापोली पोलीसांना दिली. दापोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून 17 ते 20 वर्षांच्या मुलीचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी एका मुलीची बेपत्ता म्हणून तक्रार दाखल झाली होती. तीच तर ही मुलगी नाही याची खातरजमा पोलीसांच्या माध्यमातून केली जात आहे.
त्यांनी त्या बेपत्ता असलेल्या मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे.

त्यांना ओळख पटवण्यासाठी दापोली मध्ये बोलून घेण्यात आलं आहे. या चिपळूण मधील मुलींच्या घरामध्ये शिक्षणावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली होती. त्या मुलीनं आत्महत्या केली तर नाहीना, असा संशय पोलीसांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *