Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

Dapoli दापोली : आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपकडून निषेध

banner 468x60

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून दापोली शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.

यावेळी आ. आव्हाड यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. भाजपचे केदार साठे म्हणाले की, २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि मंदिराचा सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाडांचे वक्तव्य निंदनीय आहे.

साडेपाचशे वर्षांपासून ज्या अमृत सोहळ्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे, त्या सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम आव्हाडांसारखे नेते करत आहेत.

या आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष संजय सावंत, स्वरूप महाजन, श्रीराम इदाते, जया साळवी, संदीप केळकर, अक्षय फाटक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *