Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली : कृषी विद्यापीठाचे डॉ.संतोष सावर्डेकर यांना अमेरीका येथील मिशीगन विद्यापीठाचे निमंत्रण

banner 468x60

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ.संतोष विष्णूपंत सावर्डेकर यांना अमेरिका येथे होणाऱ्या “कृषि जैवतंत्रज्ञान,जैवसुरक्षा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण” या विषयावर मिशीगन स्टेट विद्यापीठ,अमेरिका येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

या निवडीबद्दल डॉ.- संतोष सावर्डेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण या सामाजिक संघटनेचे नेते विष्णुपंत सावर्डेकर यांचे ते चिरंजीव आहेत. जागतिक पातळीवरील आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी 25 देशातील जनुकीय परिवर्तीत पिके या संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सहभाग असणार आहे.

“जागतिक तंत्रज्ञान प्रवेश कर्यक्रम” या मिशीगन स्टेट विद्यापीठ येथे सुरू असलेल्या प्रकल्पांर्तगत दिनांक 5 ऑगस्ट, 2023 ते 18 ऑगस्ट 2023 दरम्यान ही कार्यशाळा होणार आहे. जनुकीय परिर्वतन पिकांच्या संशोधनाची दिशा,जैवसुरक्षेचे नियम आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी धोरणे यावर विचार मंथन करण्यात येणार असून अमेरीकेतील मिशीगन,ओहीओ,आयोवा आणि वॉशिटन येथिल जैवतंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक,शेतकरी आणि कृषि विद्यापीठे यांना भेटी आणि त्यांचे अनुभव आदान-प्रदान करण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेमध्ये डॉ.सावर्डेकर “भारतातील पारजनुकीय पिकांच्या संशोधनाची दिशा” या विषयावर संशोधनपर लेख सादर करणार आहेत. डॉ. सावर्डेकर यांनी जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाचणीची दापोली-2 जी जास्त खनिजे आणि अधिक उत्पादन देणारी जात विकसित केली आहे.

त्याचप्रमाणे भाताची क्षारप्रतिकार पनवेल-3, नाचणी, वरी आणि वाली पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी सहभाग नोंदविला आहे. आपल्या 27 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 102 संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमधुन प्रसिद्ध केले आहेत.

त्याच प्रमाणे त्यांनी कोलंबो,ढाका आणि देशांतर्गत पार पडलेल्या सेमिनार, कार्यशाळा यांमध्ये सहभाग घेऊन 70 प्रबंध सादर केलेले आहेत. डॉ. सावर्डेकर यांनी 27 पदव्युत्तर आणि 4 आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले असुन राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील पाच पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *