Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : प्रवाशाच्या खिशातून 5 हजार रुपये चोरले, दापोली पोलिसांनी तत्काल पकडलं

banner 468x60

बसस्थानकात एसटी बसमध्ये शिरत असलेल्या प्रवाशाच्या खिशातून 5 हजार रुपये चोरणाऱ्या संशयितास पकडण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बुरोंडी भांडारवाडा येथील दिगंबर मधुकर बुरोंडकर व त्यांची पत्नी कल्पना शुक्रवारी (ता. २५) दुपारी १.३० वा. दापोली बसस्थानकातून सुटणाऱ्या दापोली- बुरोंडी शीतलनगर या बसमध्ये चढत असताना त्यांच्या पँटच्या डाव्या खिशात कोणीतरी हात घालत असल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी

खिशाला हात लावला असता त्यांच्यामागे असलेल्या इसमाने त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घेऊन पळ काढला. बुरोंडकर यांनी चोर चोर असे ओरडण्यास सुरवात केल्यावर बसस्थानकात असलेल्या पोलिसांनी या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले.

अंकुश धोंडू झोरे असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. दीपक बुरोंडकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून, या तक्रारीनुसार संशयित अंकुश झोरे याच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *