लांजा येथे मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील रेस्ट हाऊस परिसरात शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२६) सकाळी भीषण अपघात घडला. येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षातून प्रवास करणारी एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. दोघांनाही तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ११.१० वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्रमांक (MH 08 AQ 9436) मुंबई-गोवा महामार्गावरून लांजा शहरातील रेस्ट हाऊस परिसरातून जात होती. यावेळी रेस्ट हाऊस परिसरातील पेट्रोल पंपासमोर पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पो क्रमांक (MH 06 CP 3767) ने रिक्षाला जोरदार धडक दिली.
आयशर टेम्पोची धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात रिक्षाचालक आणि रिक्षामधून प्रवास करणारी महिला प्रवासी जखमी झाली. अचानक घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रिक्षातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर दोन्ही जखमींना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशा व्यस्त महामार्गावर भरधाव वाहनांमुळे अपघात घडत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.
लांजा रेस्ट हाऊस परिसरातील पेट्रोल पंपासमोर भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. अपघातातील जखमींची प्रकृती आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













