Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : भारतनगर चोरीचा आरोपी सापडला, पोलीसांची धडक कामगिरी

banner 468x60

दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथेराहणा–या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे मुलांचे शाळेला सुट्टी असल्याने 

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्या दिनांक १२/०८/२०२३ रोजी सायंकाळी ४.००वा. चे दरम्याने आपला फ्लॅटचे पुढील दरवाजाला कुलूप लाऊन बंद करुन मुलांसह त्यांचे आईवे घरी टेटवली ता. दापोली येथे गेल्या होत्या.

त्या दिनांक १६/०८/२०२३ रोजी दुपारी ३.३० वा.चे दरम्याने आपले घरी परत आल्या त्यावेळी त्यांनी त्यांचे घराचे कुलूप उघडुनदरवाजा ढकलला असता तो उघडला नाही.

त्यानंतर घरात प्रवेश केला असता घरातील लाकडी कपाटातील चांदीचे दागिने असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरूननेला म्हणून फराह मिन्नत टेटबलकर यांनी दिनांक १७/०८/२०२३ रोजी दापोली पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे.

ही माहिती प्राप्त होताच दापोदी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी दुय्यम पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुनआरोपीचा शोध घेण्याबात सूचना दिल्या.

 त्याप्रमाणे दापोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनास्थळीजाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

त्यानंतर दापोली पोलीसांनी गुप्त बातमीदाराद्वारे माहिती प्राप्त करुन तसेच रत्नागिरी येथुन श्वान पथक पाचारण करून डॉग रम्बोयाच्या मदतीनं शोध घेऊन आरोपी साकीब नासीर मुल्ला वय २२ वर्षे रा. रामराजे कॉलेजजवळ दापोली याला अटक करून

त्याचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला माल हस्तगत केला आहे. तसेच त्याने दापोली पोलीस ठाणे गु.र.नं. १३४/२०२३ भा.द.वि.क. ४५४४५७, ३८० या गुन्ह्यामध्ये चोरी केल्याची कबुली दिलेली आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक  जयश्री गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारीश्री. राजेंद्र मुणगेकर यांचे सुचनेप्रमाणे सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमारयादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, विजेंद्र सातार्डेकर, सुहासपाटील, सुरज मोरे, पंकज पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल ढोले यांनी सहभाग घेतला.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीसअधिकारी राजेंद्र मुणगेकर यांचे सुचनेप्रमाणे या कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमारयादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, विजेंद्र सातार्डेकर, सुहासपाटील, सुरज मोरे, पंकज पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल ढोले यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *