Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दाभोळ : चंडिका मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य, स्वच्छतेवरून दुकानदार आणि दाभोळ ग्रामपंचायतीचा आरोप प्रत्यारोप

banner 468x60

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात दाभोळ येथे पांडवकालीन असलेली श्री चंडिका देवीचे जागृत नवसाला पावणारे मंदिर प्रसिद्ध आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ गावाची ओळख आहे. देवीच्या दर्शनाला राज्यातून भाविक याठिकाणी येत असतात. दरवर्षी १० दिवस चंडिका देवीची जत्रा भरते.

१० दिवसात मंदिराच्या परिसरात दुकानांची रेलचेलही पाहायला मिळते. मात्र सध्या याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या १० दिवसात याठिकाणी एकही दिवस स्वच्छता न झाल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. १० दिवस उलटले मात्र साफसफाई करण्यात आलेली नाही.

परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या घाणीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता आहे. १० दिवस झाले मात्र सफाईकडे दुर्लक्ष झालं आहे.

दाभोळ ग्रामपंचायत कर घेतेय तर साफसफाई का करत नाही असा सवाल दुकानदार आणि परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आम्ही १० दिवसाला ६० रुपये कर देतो मात्र त्याबदल्यात दाभोळ ग्रामपंचायत आम्ह्यला काय देते असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. १० दिवसाला आम्ही ६० रुपये कर देतो आम्ह्यला कचऱ्याचा डब्बा ही दिला न गेल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायतीला कळवले आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही असं दुकानदारांनी म्हटलंय.

आम्ही दाभोळ येथील नागरिकांशी संपर्क साधला असता दाभोळ ग्रामपंचायतने विकास करण्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:ची दैनंदिन समस्या सोडविण्यात मश्गुल असल्याचे चित्र दाभोळ गावात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

याबाबत दाभोळ ग्रामपंचायतचे उपसरपंच उदय जावकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी म्हटलं

” ही जागा खासगी असल्याने दाभोळ ग्रामपंचायतचा संबंध येत नाही. आम्ह्यला यात्रा कर घेण्याचा अधिकार आहे.साफसफाईच्या कोणत्याही गाईडलाईन आम्ह्यला नाही. जर त्यांना या सुविधा हव्या असल्यास तसा कर पुढच्या वर्षी आकारू. आम्ही फक्त यात्रा कर घेतो. जर दुकानदारांना साफसफाई हवी असेल तर तसा समाविष्ट कर आम्ही घेऊ पण सध्या आम्ही १० दिवसाचा ६० रुपये यात्रा कर घेतो. येथील जमीनमालकाने भाडं घेतलं आहे तर त्यांनी ती साफसफाई करावी. जमीनमालक ही दुकानदारांचं भाडं घेतायत त्यामुळे साफसफाई करण्याची जबाबदारी त्यांची असल्याचं उपसरपंच उदय जावकर यांनी म्हटलं.

मात्र या आरोप प्रत्यारोपातून घाणीचं साम्रज्य जाणार का हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

गेल्या १० दिवसापासून असणारी घाण तशीच राहील्यास येणाऱ्या भाविकांनी घाणीचं साम्राज्य पाहावं की देवीचं दर्शन घ्यावं हा प्रश्न अनुत्तरित आहे.

आरोप प्रत्यारोपातून येणाऱ्या दिवसात दाभोळ गावात घाणीचं साम्राज्य अश्या बातम्या पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *