चिपळूण : काळजी घ्या ! डेंग्यूसदृश 26 रुग्ण आढळले

banner 468x60

शहरात डेंग्यूचा फैलाव वेगाने होत आहे. शहरातील विविध भागात रुग्ण आढळत असून सप्टेंबर महिन्यातील २० दिवसांत तब्बल २६ रुग्णांची नोंद येथील पालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

पालिकेने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून, साथीच्या आजारांबाबत नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

साठलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची पैदास होत आहे. त्यातील “एडिस इजिप्ती” डासापासून डेंग्यू होतो. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. त्यातून निर्माण होणाऱ्या डासांद्वारे आजाराचा प्रसार होतो.

त्याला प्रतिबंधित करता येते. त्यासाठी डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच ताप, थंडी, अंगदुखी, त्वचेवर पुरळ येणे अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. शहरातील विविध दवाखान्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *