Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : कुंभार्ली घाटातील अपघातात, एस्टीचे नुकसान

banner 468x60

चिपळूण : ट्रकने एस्टी बसला मागून धडक दिल्याची घटना कुंभार्ली घाटात रविवारी घडली.

यामध्ये एस्टी बसचे नुकसान झाले असून या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावीर यल्लपा पुजारी (२६, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नवनाथ शांताराम गायकवाड यांनी दिली आहे.

महावीर पुजारी हा त्याच्या ताब्यातील ट्रक कुंभार्ली घाटातून घेऊन जात असताना तो एका वळणावर आला असता त्याने ट्रक भरधाव वेगात चालवून एस्टी बसला पाठीमागून उजव्या बाजूस जोरदार धडक दिली.

यात एस्टी बसचा मागील बंपर तुटला आहे. तसेच खिडकीची काच फुटून नुकसान झाले आहे. या अपघात प्रकरणी महावीर पुजारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *