चिपळूण : हातखंबा येथे 2 दुचाकींचा अपघात

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गुरुवारी (ता. २) सायंकाळी सहाच्या सुमारास वडापच्या गाडीची दोन दुचाकी आणि एका मोटारीला धडक बसून अपघात झालाय.

सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी ते चिपळूण जाणाऱ्या वडापच्या गाडीवरील चालकाचा हातखंबा येथे ताबा सुटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका मोटारीला पाठीमागून धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *