Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : खेर्डी रेल्वेट्रॅकवर तुतारी एक्स्प्रेसखाली तरुणाने केली आत्महत्या, पोलिसांना सापडला शरीराचा अर्धाच भाग

banner 468x60

चिपळूण : शहरालगत असलेल्या खेर्डी रेल्वे पुलाच्याजवळील रेल्वेट्रॅकवर (Railway Tracks) तुतारी एक्स्प्रेसखाली (Tutari Express) एका तरुणाने आत्महत्या केली.

त्याचे अर्धे धड रात्री सापडले तर अर्धे अंधारात जंगलात पडल्याने सापडले नव्हते. दुपारी ४० ते ४५ पोलिस व आरसीपी जवानांनी ते शोधून काढले. हा अपघात मध्यरात्रीनंतर १.१० वाजता घडला.

रेल्वे पोलिस अजय ढोक यांनी खबर दिल्यानुसार, मध्यरात्रीनंतर खेर्डी रेल्वेट्रॅकवर मुंबईकडे जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसखाली अक्षय संभाजी मोहिते (२६, रा. कान्हे पिंपळी) याने आत्महत्या केली. पती-पत्नीत वारंवार वाद होत होते.

त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. अक्षयच्या मागे आई, पत्नी, सहा महिन्याचे मूल आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक महाडिक अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *