Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : “पबजी गेम खेळू नको” वडिल रागवले मुलाने थेट गळफास घेतला

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल (ता. राजापूर) येथील अल्पवयीन मुलगा पबजी गेम खेळत होता. त्यावरुन त्याचे वडिलांना धाक दिला. या रागातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रय़त्न केला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या उपचार सुरु आहेत.

तेजस सत्यवान गुरव (वय १८, रा. पाचल, राजापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास पाचल येथे घडली.


मिळालेल्या माहितीनुसार तेजसला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचा नाद लागला होता म्हणून वडिलांनी कामावर जाता-जाता गेम खेळू नकोस असे सांगितले.

याचा राग मनात धरुन तेजसने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घरातील मंडळीनी त्याची तात्काळ सोडवणूक केली. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *