Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : पालगड येथील नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील पालगड येथील कोंडी नदीच्या पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

युवराज यशवंत कोळुगडे (३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. युवराज हा आई व मोठ्या भावासह पालगड-संभाजीनगर येथे रहात होता.

तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करीत असे. ४ जुलै रोजी सकाळी तो घरामधून बाहेर पडला, तो परत घरी आला नाही. यामुळे त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. अखेर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह कोंडी नदीपात्रात तरंगत असलेला आढळून आला.

या बाबत पालगडचे पोलीस पाटील रुपेश बेलोसे यांना दूरध्वनीवरून – कळविण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन संबंधित माहिती दापोली पोलीस स्थानकाला कळवली. दापोली पोलीस – स्थानकाचे प्रसाद मोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अंकुश बामणे, संदीप इंदुलकर व सुनील मोरे यांनी मदत केली. यानंतर मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *