Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : लोटे एमआयडीला जाग कधी येणार, लोटे एमआयडीचा मनमानी कारभार, उघड्यावर सोडले रासायनिक सांडपाणी, परिसरात दुर्गंधी

banner 468x60

खेड एमआयडीसी परिसरात मुसळधार पावसात उघड्यावर वाहाणाऱ्या ओढे आणि नाल्यात चक्क रासायनिक सांडपाणी वाहात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. लोटे एमआयडीसी हा परिसर केमिकल झोन आहे.

येथील रासायनिक कंपन्यांनी त्यांचे रासायनिक सांडपाणी सामूहिक सांडपाणी प्रकल्प म्हणजेच सीएईटीपीमध्ये सोडून त्या ठिकाणी त्या दूषित रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून नंतर ते लांब खाडीत सोडले जाते.

या साठी प्रत्येक कंपनीला ठराविक क्षुल्क आकारले जाते, आपला आर्थिक फायदा होण्यासाठी लहान आणि मध्यमवर्गीय कंपन्यांकडून पावसाचा फायदा घेऊन रासायनिक सांडपाणी सरळ सरळ उघड्यावर ओढे आणि नाल्यात सोडले जाते, या संदर्भात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून उघड्यावर घातक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरामध्ये सतत होणाऱ्या या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे सरचिटणीस संजय आखाडे हे आक्रमक झाले आहेत एमआयडीसीतील दोन कंपन्या समोर चेंबर मधून व गटारातून उघड्या वरती पाणी सोडण्याचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला संजय आखाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोटे एमआयडीसीमधील दोन कंपन्यांच्या खान इंडस्ट्रीज कंपनी व लासा कंपनी च्या आवारातून थेट वाहत्या गटारामध्ये व नाल्यांमध्ये पाणी सोडले जात.

यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार देखिल केली असल्याचे सांगितले. घातक रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या या कंपन्या वर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा संतोष आखाडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *