Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Ratnagiri रत्नागिरी : जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

banner 468x60

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर तर सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी रात्री उशिरा बदल्याचे आदेश काढण्यात आले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 4 पोलीस निरिक्षकांच्या रत्नागिरीत बदल्या करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीतील भरत ज्ञानदेव धुमाळ, रत्नागिरी ग्रामीणचे मारुती जगताप, संगमेश्वरचे सुरेश गावित, देवरुखचे प्रदिप पोवार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदल्यात सिंधुदुर्ग येथून निळकंठ बगळे, अतुल जाधव, अमित यादव, फुलचंद मेंगडे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरिक्षकांसोबतच जिल्ह्यातील 10 सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चिपळूणचे रत्नदीप साळोखे यांची रत्नागिरी ग्रामीणला, चिपळूणच्या रुपाली पाटील यांची रत्नागिरी शहरला, दाभोळचे तुषार पाचपुते यांची चिपळूणला, अलोरेचे सुजित गडदे यांची लांजा पोलीस स्थानकात, रत्नागिरी ग्रामीणचे मनोज भोसले यांची देवरुखला, पुर्णगडचे विजय जाधव यांची जिल्हा वाहतुक शाखेत,

लांजाचे प्रविण देशमुख यांची चिपळूण येथे, नियंत्रण कक्षातील भरत पाटील यांची अलोरे येथे, जिल्हा वाहतुक शाखेतील सुधीर धायरकर यांची पुर्णगड येथे, स्थानिक गुन्हे शाखेतील अमोल गोरे यांची दाभोळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. चिपळूणमधील वंदना कनौजा यांची खेड पोलीस स्थानकात तर पूजा चव्हाण यांची दापोली पोलीस स्थानकात, गुहागर येथील पवन कांबळे यांची रत्नागिरी शहरला, रत्नागिरी शहरच्या प्रशांत जाधव यांची खेड पोलीस स्थानकात, आकाश साळुंखे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, शांताराम महाले यांची चिपळूण पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.

खेड येथील सुजित सोनावणे यांची गुहागरला, रत्नागिरी शहरच्या अनुराधा मेहेर यांची चिपळूण येथे, चिपळूण पोलीस स्थानकातील शाम आरमाळकर यांची रत्नागिरी शहरला, राजापूर पोलीस स्थानकातील शिल्पा वेंगुर्लेकर यांची चिपळूण येथे तर सावर्डे येथील धनश्री करंजकर यांची राजापूर पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *