Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धेत अथर्व विखारे, अफशा आंबेडकर प्रथम

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धेत प्राथमिक गटात युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणचा विद्यार्थी अथर्व मिलिंद विखारे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

माध्यमिक गटात पै. एच.डी मुल्ला माध्यमिक विद्यालय कुरधुंडा संगमेश्वरची विद्यार्थीनी अफशा हुसैन आंबेडकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.


जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धा, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, औषधी वनस्पती, पीपीटी व नोंदवही स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता झाला.

उर्वरीत निकाल पुढीलप्रमाणेः

प्राथमिक गट- द्वितीय- वेदरत्न राजाराम मलगुंडे (राजापूर हायस्कूल राजापूर), तृतीय- समृद्धी संदिप दूसार (सरस्वती विद्यामंदिर जामसूत), चतुर्थ- आदिती अमोल जाधव (ज.गपेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे), पंचम- अम्मारा अझरुद्दीन हुश्ये ( मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी)

माध्यमिक गटः द्वितीयः तहरीन शब्बीर नाखेरकर (नवजीवन हायस्कूल राजापूर), तृतीयः ऋषिकेश रमेश महाडिक (बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी दापोली), चतुर्थः वैष्णवी संतोष आईर (कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे, खेड)पंचमः संस्कृती उदय पालकर (वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालशेत गुहागर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *