Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी

banner 468x60

बेदरकारपणे दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केला.

यात दुचाकीवरील तरुणाला गंभीर दुखापत झाली असून ही घटना रविवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१५ वा. सावरकर नाट्यगृह ते लोटलीकर हॉस्पिटल जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे.

या प्रकरणी साईराज रमेश भाटकर (रा. एमआयडीसी, रत्नागिरी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या अपघातात अफान अब्दुल्ला फक्रुद्दीन मुल्ला (२२, रा. मजगाव रोड, रत्नागिरी) याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत त्याचा भाऊ फारुख मुल्ला (२४) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, रविवारी दुपारी त्याचा भाऊ अफान हा आपल्या ताब्यातील बुलेट दुचाकी घेऊन सावरकर नाट्यगृह ते लोटलीकर हॉस्पिटलमधील रस्त्यावरून जात असताना साईराज भाटकरने त्याच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात अफान गाडीवरून खाली पडून त्याच्या उजव्या पायाला प्रक्चर झाले आहे.

हा अपघात केल्यानंतर साईराज तिथून निघून गेला होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात भा. दं. वि. कायदा कलम २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ / १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *