Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : सावर्डे परिसरातील साडेतेरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून सुरळीत

Screenshot

banner 468x60

चिपळूण सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले. कालच रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत एकूण 13 हजार 500 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

सावर्डा, निवळी, कोकरे, डेरवण, कुडप, हडकणी, असुर्डे खेरशेत गावातील काही ग्राहक पोल पडल्यामुळे अंधारात आहेत. उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यास महावितरण प्रयत्नशील असल्याची माहिती महावितराणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले-देसाई यांनी दिली.

सावर्डा उपविभागामध्ये सावर्डे व डेरवण भागात काल दिनांक 22 मेरोजी दुपारी अंदाजे तीन वाजता प्रचंड वारा वादळ व पाऊस झाल्यामुळे खूप मोठी झाडे पडली होती. त्या झाडांमुळे महावितरणच्या यंत्रणेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

यामध्ये तेथे 33 के व्ही उच्चदाब वाहिनीचे 7 पोल, 11 के व्ही उच्चदाब वाहिनीचे 28 पोल व लघुदाब वाहिनेचे 54 पोल असे एकूण 100 पोल पडले. तसेच बऱ्याच ठिकाणी लघुदाब वाहिनी व उच्चदाब वाहिनीच्या तारा तुटल्या आहेत. या वादळामुळे महावितरणचे एकूण अंदाजे रू. 38 लाख चे नुकसान झालेले आहे.


हे पोल पडल्यामुळे सावर्डे उपविभागातील एकूण 25 हजार 500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता.


वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले. कालच रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत एकूण 13 हजार 500 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *