Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : मंत्री महोदय उदय सामंत प्रचारात, जनता मात्र उन्हात, “सभेचा मंडप नको थोडी निवारा शेड द्या”

banner 468x60

गेल्या वर्षापासून रत्नागिरी बसस्थानकाचं काम रखडलेलं आहे मात्र नेत्यांचं याकडे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रचारात घोषणा दमदार मात्र रत्नागिरीतील प्रवासी मात्र उन्हात असल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे नेते प्रचारात व्यस्त असून आपल्या मतांची जुळवाजुळव करत आहेत.

प्रचाराच्या सभेचा मंडप एका दिवसात उभा राहतो मात्र 50, 100 लोकांसाठी एक निवारा शेड नाही. नेत्यांना सर्वसामान्य माणसांकडे यानां लक्ष द्यायला वेळ नसल्याचं प्रवासी सांगत आहेत.

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम रखडल्यामुळे प्रवाशांना बससाठी उन्हातान्हात उभं रहावं लागत आहे. त्यात आता रहाटाघर या बसस्थानकाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना बससाठी बसस्थानकाबाहेर उन्हातान्हात उभे रहावे लागते.

त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रत्नागिरी बसस्थानकाचे काम गेले अनेक वर्ष रखडले आहे. बसस्थानकाचे काम सुरू झाल्यापासून प्रवाशांना बससाठी रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. बससाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे रहात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. त्याठिकाणी एक शेड उभी करण्यात आली आहे मात्र ती शेड पुरेशी नाही.

त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रचारातून बाहेर पडून सभेचा मंडप नको पण थोडा का होईना निवारा द्या अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. मंत्री महोदय याकडे कधी लक्ष देणार हे पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *