लांजा : आंजणारी पूल येथे ट्रकला भीषण अपघात

banner 468x60

गुजरातहून गोव्याच्या दिशेने जाणारा १६ चाकी ट्रक आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल होऊन थेट काजळी नदीत पडता पडता वाचला. या भीषण अपघातात सुदैवाने ट्रकचे चालक आणि क्लिनर बचावले आहेत.

हा अपघात आज सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुमारास आंजनारी पुल येथे घडला आहे.

घटनास्थळावरून मिळालेला माहितीनुसार गुजरातहून गोव्याच्या दिशेने जाणारा (जिजे 37 टी- 63 22 )या क्रमांकाचा ट्रक आंजणारी घाटातील तीव्र उतार उतरत असताना ट्रकचे ब्रेक फेल झाले त्यामुळे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक भरधाव वेगाने आंजणारी पुलाचा कठडा तोडून थेट खाली कोसळला. या अपघात होत असताना त्याने येथील दत्त मंदिराची कमान देखील तोडली.

त्यानंतर हा ट्रक काजळी नदी जाता जाता थोडक्यात वाचला आहे. मात्र या अपघातात ट्रकचे चालक व क्लिनर बालंबाल बचावला . यामध्ये क्लीनरच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या दोघांना तात्काळ पाली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *