Breaking News
गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी खेड : व्यवस्थापन क्षेत्रात करिअरची संधी MBA / MMS प्रवेशासाठी ATMA 2026 द्वारे सुवर्णसंधी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू दापोली : दहावी परीक्षेत अर्पण साळवेची झेप, सीबीएसई बोर्डात 98.80% गुण रत्नागिरी : उन्हाच्या तडाख्यात सरकारचा दिलासादायक निर्णय; एप्रिलमध्येच मिळणार तीन महिन्यांचे रेशन, एप्रिल, मे, जूनचे धान्य एकत्र वाटप रत्नागिरी : नोटेच्या बदल्यात लाखांचे स्वप्न, 15 लाखांचे आमिष, 9 लाखांचा गंडा “जुन्या 5 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात 15 लाख रुपये मिळवून देतो”

Khed खेड : दापोलीनंतर खेडमध्ये सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर, खेडमध्ये तणाव, परिस्थिती नियंत्रणात

banner 468x60

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मंगळवारी रत्नागिरीसह दापोली, चिपळूण व राजापुरात समाजबांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होवून संतप्त नागरिक पोलीस स्थानकांवर धडकले.

कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी जॉइन करा कोकण कट्टा लाईव्ह व्हॉट्सअप ग्रुप

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

दापोलीनंतर खेडमध्ये काही जणांनी सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक पोलीस आणि मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय बुटाला, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह हिंदू बांधवानी संयमाची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठेही वाद निर्माण झाला नाहीय. दापोलीनंतर खेडमध्येही काही समाजकंटकांनी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकून संपूर्ण तालुक्यातील वातावरण बिघडविणाचे काम केले आहे, असे हिंदूत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.

खेड तालुक्यात अशा आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन धर्मियांमध्ये धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने खेडमध्ये पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी वाढविण्यात आला आहे. बुधवारी सकाळीच मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर,

माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय बुटाला, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह तमाम हिंदु बांधव खेड पोलीस स्थानकासमोर धडकले आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍या तरुणांविरोधात तक्रार देऊन या समाजकंटकांना तात्काळ अटक करून

गुन्हा दाखल करा आणि कडक शासन करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर खेड तालुका शांतता कमिटीची बैठक पार पडली असून खेडवासियांना शांततेचे आवाहन येथील प्रशासन व पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *