Breaking News

महाड : भरधाव टेम्पोने चौघांना उडवलं, दोघांचा मृत्यू

banner 468x60

अलीकडे भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाने नागरिकांना उडवण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. असा काहीसा प्रकार महाड येथे घडला आहे. महाड तालुक्यातील काळीजकोंड परिसरात भरधाव वेगाने जाणार्‍या एका टेम्पोने रस्त्यावरुन चालणार्‍या चौघांना उडवलं.

या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सदर घटना काळीजकोंड परिसरात सोमवार रात्री घडली आहे. हे चौघे महाड एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला असून रात्रीपाळीसाठी रस्त्यावरून पायी जात असताना एका वेगाने येणार्‍या टेम्पोने धडक दिली.

त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविन्द्र ढेबे आणि सचिन ढेबे अशी मयतांची नावे आहेत तर दोघे संतोष ढेबे आणि निलेश ढेबे हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *