Breaking News
मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार BREAKING चिपळूण हल्ला प्रकरण : सर्व संशयित आरोपींची नावं समोर, प्रेमविवाहाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील पाच जणांवर जीवघेणा हल्ला, सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, कोयता, रॉड आणि काठ्यांनी सपासप वार दापोली : स्कूल बसला कारची धडक, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप, दोन्ही वाहनांचे नुकसान

गुहागर : वेळणेश्वर अडुर कोंड कारूळ येथे घरावर संरक्षक भिंत कोसळून नुकसान

banner 468x60

गुहागर तालुक्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडण्याचा प्रकार घडत आहे तर अडूर कोंड कारूळ येथे घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे .

प्रशासनाने घरातील सदस्यांना मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास अन्य ठिकाणी राहण्याची सूचना दिली आहे तालुक्यातील अडूर कोंड कारुळ येथील राजेश रमेश जाक्कर यांच्या घराची संरक्षक भिंत शेजारील दिनेश शांताराम असगोलकर यांच्या घरावर पडून घराच्या भिंतींना तडा व छताचे नुकसान झाले आहे

दिनेश असगोलकर यांचे 75,500 रुपयाचे नुकसान झाले आहे तर राजेश जाक्कर यांचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीचा पंचनामा करून महसूल विभागात याची नोंद करण्यात आली आहे

गुहागर तालुक्यात गुरुवारी घेतलेल्या पावसाच्या नोंदीमध्ये 83 मिलिमीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत एकूण 629.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *