Breaking News
BREAKING चिपळूण हल्ला प्रकरण : सर्व संशयित आरोपींची नावं समोर, प्रेमविवाहाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील पाच जणांवर जीवघेणा हल्ला, सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, कोयता, रॉड आणि काठ्यांनी सपासप वार दापोली : स्कूल बसला कारची धडक, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप, दोन्ही वाहनांचे नुकसान चिपळूण : गोवा बनावटीची दारू जप्त, 40 बॉक्ससह इनोव्हा जप्त संगमेश्वर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध, 20 वर्षीय तरुणाविरुद्ध देवऱुख पोलिसांत गुन्हा दाखल चिपळूण कोयता हल्ला प्रकरणी दोघांना अटक, चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई; सातपैकी दोघे ताब्यात, अब्दुल शेख आणि अमन शेख मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांच्या हाती, अन्य पाच संशयित फरार, शोधमोहीम सुरू

BREAKING चिपळूण हल्ला प्रकरण : सर्व संशयित आरोपींची नावं समोर, प्रेमविवाहाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील पाच जणांवर जीवघेणा हल्ला, सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, कोयता, रॉड आणि काठ्यांनी सपासप वार

banner 468x60

चिपळूण येथे प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील पाच जणांवर लोखंडी कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. भेंडीनाका येथे सुरू झालेल्या वादाचे रूपांतर गोवळकोट बायपासवरील एन्रॉन पुलाजवळ हिंसक हल्ल्यात झाले. या घटनेत एका महिलेसह पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सातपैकी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे.

सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

या प्रकरणी सानिया फैजान चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७२/२०२६ अन्वये २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whatsap Join Group

https://chat.whatsapp.com/BS2ocjA5O6i9rhF44nfXxg?s=sh&p=i&mlu=4&ilr=4

आरोपी म्हणून अब्दुल बाबासाहेब शेख (वय ६७), खालीद अब्दुल शेख (वय ४२), साहिल अब्दुल शेख (वय ३१), शाहिद अब्दुल शेख (वय २१), सिकंदर अब्दुल शेख (वय ४५), रुबीना जमीर मजावर (वय ३८) आणि अमन फारुख शेख (वय २४) यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ११८(१), ११८(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात; पाच जणांचा शोध सुरू

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सानिया फैजान चौगले (वय २२, रा. खेर्डी मोहल्ला, चिपळूण) यांनी फैजान चौगले यांच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून हा वाद झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

https://www.instagram.com/reel/DgKcM7pt3Jh/?bqrl=MXFiZzVqcHJhNGU3cw==

२५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सानिया आणि त्यांचे पती फैजान हे भेंडीनाका येथून जात असताना त्यांची मोटारसायकल अचानक बंद पडली. त्यावेळी आरोपींपैकी अब्दुल बाबासाहेब शेख याने सानिया यांच्याकडे पाहून हसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत फैजान यांनी त्याला विचारणा केली असता अब्दुल शेख याने फैजान यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

https://www.instagram.com/reel/DgK0aX9tfQF/?cnvx=M2Zkdm5xcWp0cHlq

फोनवरून कुटुंबीयांना बोलावले

भेंडीनाका येथे झालेल्या या प्रकाराची माहिती सानिया यांनी आपल्या सासरच्या मंडळींना फोन करून दिली. तसेच कुटुंबातील सदस्यांना भेंडीनाका येथे येण्यास सांगितले. दरम्यान, साक्षीदार क्रमांक चार हिने फैजान यांना फोन करून आरोपींकडून गोवळकोट बायपासवरील एन्रॉन पुलाजवळ लोखंडी कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी मारहाण सुरू असल्याचे सांगितले.

ही माहिती मिळताच सानिया आणि अन्य कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले.

कोयता, रॉड आणि काठ्यांनी सपासप वार

गोवळकोट बायपासवरील एन्रॉन पुलाजवळ पोहोचल्यानंतर आरोपी क्रमांक एक ते सात यांनी सानिया यांच्यासह फैजान आणि अन्य कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

या हल्ल्यात रेहान साबळे, फैजान चौगले, सऊद चौगले, सलमा चौगले आणि सानिया फैजान चौगले हे पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

दरम्यान, या हल्ला प्रकरणातील सात जणांपैकी अब्दुल शेख आणि अमन शेख या दोघांना मुंबईच्या दिशेने जात असताना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अन्य पाच संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बुलडोझर कारवाईनंतर पोलीस तपासालाही वेग

या कोयता हल्ला प्रकरणानंतर संबंधित फळ दुकानावर करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईचीही चिपळूण शहरात चर्चा झाली होती. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. आता या प्रकरणात दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याने तपासाला वेग आला आहे.

प्रेमविवाहाच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट कोयता, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी झालेल्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने चिपळूणमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यामागील नेमकी पार्श्वभूमी, सर्व संशयितांचा सहभाग आणि घटनेतील इतर बाबींचा तपास आता पोलीस करत आहेत. उर्वरित पाच संशयितांना पोलीस कधी ताब्यात घेतात, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.