दापोली : स्कूल बसला कारची धडक, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप, दोन्ही वाहनांचे नुकसान

banner 468x60

दापोली-खेड मार्गावरील हिल टॉप परिसरात गुरुवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी स्कूल बसला कारने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी तसेच दोन्ही वाहनांतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.


मिळालेल्या माहितीनुसार, दापोली-खेड मार्गावरील हिल टॉप परिसरात एक स्कूल बस रस्त्याच्या कडेला उभी होती. याचवेळी मागून आलेल्या कारने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.


या घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली. मात्र, अपघातात स्कूल बसमधील मुलांसह दोन्ही वाहनांमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

यामुळे पालकांसह स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, शाळेच्या वाहनांबाबत आणि महामार्गावर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.