Breaking News
दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार BREAKING चिपळूण हल्ला प्रकरण : सर्व संशयित आरोपींची नावं समोर, प्रेमविवाहाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील पाच जणांवर जीवघेणा हल्ला, सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, कोयता, रॉड आणि काठ्यांनी सपासप वार दापोली : स्कूल बसला कारची धडक, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप, दोन्ही वाहनांचे नुकसान चिपळूण : गोवा बनावटीची दारू जप्त, 40 बॉक्ससह इनोव्हा जप्त

दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

Screenshot

banner 468x60

दापोली बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये एक अनोळखी पुरुष निपचित अवस्थेत आढळून आल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याला मृत घोषित केले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्षे असून त्याचे नाव व गाव याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. २५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान तो दापोली बसस्थानकाच्या बाजूच्या गल्लीमध्ये निपचित पडलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांना दिसून आला.


नागरिकांनी तत्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रात्री ९ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून तो कोणत्या परिसरातील रहिवासी होता, याबाबत माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्यक्तीला ओळखणाऱ्या नागरिकांनी दापोली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.