Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गुहागर :लिटिल चॅम्प्स स्कूल जानवळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत सुयश

banner 468x60

कुमारी अन्वी दाभोळकर ग्रुप सी विभागात राज्यात तृतीय

पाटपन्हाळे (वार्ताहर) कला विकास संस्थेतर्फे नुकत्याच आयोजित राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम

स्कूल जानवळेची इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी कुमारी अन्वी विदेश दाभोळकर या विद्यार्थिनीने ग्रुप सी विभागात राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.

त्याबद्दल कला विकास संस्थेतर्फे तिला सर्टिफिकेट, ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर स्कूलमधील इयत्ता पहिली मधील कु.ओवी संदीप मांडवकर, कु रिद्धी बाळासाहेब लबडे, इयत्ता दुसरी मधील कु. अधिरा उमेश खैर, कु. श्रेया सचिन चव्हाण, इयत्ता तिसरी मधील कु अनुश्री मनोज सकपाळ, कुमारी शुभ्रा प्रताप चव्हाण, इयत्ता पाचवी मधील कु. स्वरा सूर्यकांत सुर्जन, कु. श्रवण अशोक साळवी, इयत्ता सहावी मधील कु. श्रिया तेजस आंबेकर, इयत्ता सातवी मधील कु.अंशिका रामअचल चौबे, इयत्ता नववी मधील कु. ऋग्वेद रवींद्र गुडेकर, सिनियर केजी ग्रुप विभागामध्ये मायरा अजय नार्वेकर व उत्तेजनार्थ पारितोषिक ज्युनिअर विभागात कु. रिदाँय युवराज भोसले व कु. आयुष लुकमान तडवी यांनी या १४ मुलांनी स्पेशल आर्ट मेरिट ची ट्रॉफी जिंकली आहे. त्याबद्दल या सर्व मुलांचे संस्थेतर्फे व स्कूल तर्फे गौरव करण्यात आला. तसेच स्कूलला कला विकास संस्थेतर्फे ऍक्टिव्ह स्कूलचा अवॉर्ड देण्यात आला. या सर्व मुलांना सहकार्य व मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक हेमंत गणपत शिरकर यांना कलामित्र अवॉर्ड व रोख रुपये पाचशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्कूलचे शिक्षक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री.हेमंत शिरकर, सौ साक्षी शिरकर तसेच शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पालक, शिक्षक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *