Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

गुहागर : घराच्या माळ्यावरून पडून तरूणाचा मृत्यू

banner 468x60

तालुक्यातील कोळवली भुवडवाडी येथे घराच्या माळ्यावर चढून काम करीत असताना तरूणाचा तोल जाऊन तो खाली पडल्यानें यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता घडली.

राहुल दत्ताराम भुवड (वय ३५) असे मृत तरूणाचे नाव आहे. राहुल मंगळवारी आपल्या घराच्या माळ्यावर काम करण्यासाठी चढला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्याला तातडीने घरातीलच अनिल शंकर भुवड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली येथे दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद गुहागर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *