Breaking News
रत्नागिरी : कुवारबाव येथे तीन डंपरची धडक, ब्रेक फेल झाल्याने अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली मंडणगड : आंबेत पुलाला बार्जची धडक होऊन महिना उलटला, अवजड वाहतूक अद्याप बंदच, स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती, तरी निर्णय रखडला; प्रवासी, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांचा प्रशासनाला सवाल रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’अंतर्गत महिला सुरक्षा समिती व भरोसा सेलची संयुक्त बैठक दापोली : ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तक्रार दाभोळ पोलिसांकडे वर्ग दाभोळ : खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराप्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीचे नुकसान, मंत्री नितेश राणे यांचे यंत्रणांना निर्देश

दापोली : विवाहितेची 2 वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडीतील एका विवाहितेने आपल्या पोटच्या 2 वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना दापोलीत घडलीय .

banner 728x90

27 वर्षीय सीया सूरज म्हाब्दी हिने आपल्या दोन वर्ष दोन महिन्याचा मुलगा समर याच्यासह आज शुक्रवार दिनांक २८ जून रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीय. दरम्यान आत्महतेचं कारण अस्पष्ट आहे.

याबाबत दापोली पोलीस अधिकचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज घरातील सर्व मंडळी घरच्या कामाला लागली होती. मात्र काही वेळानंतर घरीतील सीया आणि तिचा मुलगा नसल्याचे घरच्यांचे लक्षात आले.यानंतर शोधाशोध सुरू झाली.

मात्र कुठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.ही नोंद सुरू असतानाच विहीरीच्या काठावर चप्पल असल्याचे आढळून आले.

शंका बळावल्याने विहिरीत शोध घेतला असता माय लेकराचे मृतदेह आढळून आला ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून पंचनामा होऊन शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Responses (3)

  1. पण तुम्हाला कसं माहीत की आत्महत्या आहे, तुम्हाला पूर्ण माहिती माहीत आहे का??
    विनंती आहे पूर्ण माहिती पडताळून पहा.
    जेणेकरून त्या दोघांना न्याय मिळेल. जी आई आपल्या मुलासाठीच जगत होती ती त्याच्यासोबत जीव देणं शक्य नाही.

  2. आपलं म्हणणं आम्ह्याला मान्य आहे… पण अश्या बातम्यांमध्ये आम्ही थेट भूमिका घेऊ शकत नाही जोपर्यंत आम्ह्याला पूर्ण माहिती मिळत नाही घटना शुक्रवारी घडली आहे . घटनेला अनेक कंगोरे असू शकतात. प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत असते. जोपर्यंत पोलिसांचा तपास किंवा त्यांच्या घरच्याचं याबाबत कोणतीही माहिती येत नाही तोपर्यंत आम्हीही दुसरा कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. त्यांनी आत्महत्या का केली कौटुंबीक छळ आहे का की वेगळं कारण याबाबतचा पुरावा मिळू शकत नाही तोपर्यंत आम्हीही अश्या बातम्यांमध्ये ठोकताळे मांडू शकत नाही. पण या बातमीला आम्ही पूर्ण न्याय देऊ. ज्या पध्दतीने आम्ही सायली नागे मृत्यू प्रकरणात भूमिका घेतली. – कोकण कट्टा न्युज

    1. बरोबर आहे तूमचा पण जर पोलिसांनी कसून चौकशी केली तर त्यांच्या बऱ्याचं गोष्टीं समोर येतील..तुम्हाला पंचनामा मध्ये काय आहे यातल काही समोर आलं का??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *