दापोलीत 22 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

दापोली : दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तसेच दम लागत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या २२ वर्षीय तरुणीचा दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. निकीता नामदेव राठोड (वय २२, मूळ रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक; सध्या रा. काळकाई कोंड, ता. दापोली) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकीता राठोड हिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तसेच तिला दम लागत असल्याने आणि डायलिसिसची आवश्यकता असल्याने तिला २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१३ वाजता दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६९/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

या घटनेची नोंद २४ सप्टेंबर रोजी रात्री ८.०७ वाजता करण्यात आली. पुढील कार्यवाही दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *