Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली : कोकणपट्ट्यातील सुमारे 2 हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी

banner 468x60

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकणाला जवळपास 2 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मंत्री चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील जालगाव येथे अर्थसंकल्पामधील मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केदार साठे, संजय सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मंत्री चव्हाण म्हणाले, जिल्ह्याला शासनाच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आलेला आहे.

शासनाच्या विविध योजना आहेत, त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या शासनाच्या काळात सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्याद़ृष्टीने विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी हाती घेण्यात आले आहेत. आंबेत पुलाची दुरुस्ती यासारखी जी कामे प्रलंबित होती, त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.

अर्थसंकल्पामध्ये कामाचा स्कोप बघून आवश्यक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *