Breaking News
दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली- दाभोळ रस्त्यावर एसटी आणि कार चा अपघात

banner 468x60

दापोली दाभोळ रस्त्यावर वळणे एमआय डी सी येथे एसटी आणि कार मध्ये अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार दापोली कडून नितीन जाधव हे आपली कार घेऊन दाभोळकडे निघाले असता समोरून येणाऱ्या एसटी चालकाचा आपल्या एसटी वरील ताबा सुटला आणि कारला घासत उजव्या बाजूने एसटी पुढे गेली.

यामुळे कारचे उजव्या बाजूचे चालकाच्या बाजूचे खूप नुकसान झाले आहे .कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र एसटीतीलच एका महिलेचा हात हा जायबंदी झाला असल्याची माहिती समोर येत आहे.


एकंदरीतच एसटीची दुरावस्था, एसटी चालकांकडून होणारे वारंवार अपघात, अनियंत्रित वेळापत्रक या सगळ्या गर्तेतच एसटी पुढील प्रश्नचिन्हांच्या यादीत वाढ होत आहे.

याबाबतीत वाहतूक नियंत्रक आणि दापोली एसटी आगारप्रमुखांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा नागरिकांनी केली आहे. अपघाताच्या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *