Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : अपघातात माजी सरपंचांचा मृत्यू

banner 468x60

रस्त्याच्या विरूध्द दिशेने भरधाव वेगात दुचाकी चालवित समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक देऊन अपघात केल्याची घटना २७ मे रोजी चिपळूण तालुक्यातील उमरोली पेट्रोल पंपाजवळ घडली.

या अपघातात जखमी झालेले कात्रोळी येथील माजी सरपंच यांचा मृत्यू झाला असून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या एकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन सुभाष बोंडकर (रा. पागनाका, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद संतोष दत्ताराम पडवेकर (४५, कात्रोळी) यांनी दिली आहे. तर दत्ताराम बेंडू पडवेकर (७५, कात्रोळी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम पडवेकर हे त्यांच्या दुचाकीने गुहागर- चिपळूण मार्गाने उमरोली येथील पेट्रोल पंपात जात होते. त्यावेळी अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *