Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दापोली : आमदार योगेश कदमांच्या फलकाची दापोलीत तोडफोड, 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

दाभोळ : दापोली शहरात आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरला दापोली शहरातील स्वा. सावरकर चौक, आसऱ्याच्या पुलावर आमदार योगेश कदम यांचे दिवाळी शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते.

ते १५ नोव्हेंबरला रात्री अज्ञाताने फाडले होते. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्या रात्री संतोष बिडकर व त्यांच्यासोबत २ अनोळखी यांनी हे फलक ओढून त्याची तोडफोड करून नुकसान करत असल्याचे आढळून आले.

त्यानंतर शिवसेना शहर शाखाप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी दापोली पोलिस (Dapoli Police) ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर संशयित संतोष बिडकर व दोघा अज्ञातांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजेंद्र नलवडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *