Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : तरुणीला ब्लॅकमेल, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या महेंद्रकुमार दुज्जीला अटक

banner 468x60

खेड तालुक्यातील एका गावातील तरुणीस ब्लॅकमेल करत शिवीगाळसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताच्या मुसक्या पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातारा येथे आवळल्या.

महेंद्रकुमार दुज्जी भारतीया (३१, रा. प्रयागराज-उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
महेंद्रकुमार महामार्गावरील स्वाद नामक बेकरीत संशयित कामाला होता. त्याने पीडित तरुणीचे फोटो स्वतःच्या फेसबुक अकाऊंटमध्ये.

अपलोड केले होते. त्यानंतर तरुणीला व्हॉटस्अॅपवरून सतत एसएमएस करत मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यानंतर २४ जानेवारी रोजी मोबाईलवरून कॉल करत अश्लील भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती.

संशयिताकडून सतत ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न सुरू होता. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक सातारा येथे रवाना झाले होते.

पथकात पोलीस हवालदार पी.बी. कोकणे, पोलीस शिपाई वैभव ओहोळ, राम नागुलवार यांचा समावेश होता. संशयित सातारा येथील वाडा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवारी सापळा रचून मुसक्या आवळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *