Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

खेड : अश्लील व्हिडिओची धमकी प्रकरण – महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताची बँक खाती गोठविली

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात एका महिलेला अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुलाम मोहिद्दीन रफिक परकार Ghulam Mohiddin Rafik Parkar (वय ३२, रा. साखरोली-खेड) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या बँक खात्यांवर कारवाई करून ती गोठवण्यात आली आहेत.


तपासानुसार, संशयिताने पीडित महिलेशी जवळीक साधून तिचे खासगी फोटो व व्हिडिओ वापरत ब्लॅकमेलिंग सुरू केले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने मोठी रक्कम उकळली. इतकी रक्कम दिल्यानंतरही तो पैशांची मागणी सुरूच ठेवत असल्याने पीडितेने अखेर Khed Police Station येथे तक्रार दाखल केली.


पोलिस निरीक्षक Vivek Ahire यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू करून संशयिताला मुंबईत सापळा रचून अटक केली. तपासात असेही समोर आले की, उकळलेली रक्कम काही प्रमाणात परदेशात, विशेषतः Saudi Arabia येथे पाठवण्यात आली आहे.


सध्या संशयिताच्या बँक खात्यांमध्ये असलेली रक्कम गोठवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीची पोलीस कोठडी लवकरच संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणामुळे सायबर ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *