मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी पोलीस चौकीजवळ रविवारी (26 एप्रिल) पहाटे दुचाकीचा अपघात होऊन एक जण जखमी झाला. जखमीला तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास खेडहून पुण्याकडे जात असलेली दुचाकी (एमएच १२ टीएम २४१८) कशेडी येथील वाहतूक पोलीस चौकीजवळ आली असता चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला.
या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली सेवेत असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणिज धाम यांची २४ तास कार्यरत विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली.
या अपघातात दुचाकीस्वार अविनाश बबन चिनकटे (वय ३०, रा. संगलट) हे जखमी झाले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमीला त्वरित कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













