Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : महिलेवर अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

banner 468x60

खेड तालुक्यातील कुडोशी गावात महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रवींद्र सीताराम पवार (४८ रा. कुडोशी-खेड) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

banner 728x90

ही घटना ५ एप्रिल २०२० मध्ये घडली होती.
आरोपी पीडित महिलेच्या घरी घुसून वारंवार माझ्यावर प्रेम कर असा तगादा लावत त्रास देत होता. पीडितेने त्याला नकार दिल्याचा राग मनात धरत त्याने तिला पट्ट्याने मारहाण केली.

तसेच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून लैंगिक अत्याचार केला. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे ॲड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *