खेड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यात ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अडीच किलोमीटर लांबीच्या कशेडी बोगद्याच्या दोन्ही लेनमधील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता बोगद्यातील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.


रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात ट्रकला अचानक आग लागली. आगीमुळे संपूर्ण बोगद्यात प्रचंड धूर पसरला होता. त्यामुळे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने बोगद्याच्या दोन्ही लेनमधील वाहतूक बंद केली होती. या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक जुन्या कशेडी घाटातून वळवण्यात आली होती. त्यामुळे काही काळ वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.


दरम्यान, बोगद्यातील आग आणि धुराची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाकडून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला असून, वाहतूक पूर्ववत झाली आहे.


वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











